ऑर्बिट हॉस्पिटलच्या निष्काळजी पणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू वडिलांचा आरोप!
अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत रामनगर परिसरातील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये भांबेरी येथील समीर संदीप भोजने या वर्ष याच्यावर 11 जून पासून उपचार सुरू होता पण ऑर्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरवशावर हॉस्पिटल चालवले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचे मृत्यू झाल्याचा दावा वृद्धकांच्या वडिल संदीप भोजने राहणार तेल्हारा तालुक्यातील गाव भांबेरी जिल्हा अकोला यांनी केला आहे ऑर्बिट हॉस्पिटल च्या मॅनेजमेंट कडून याविषयी त्यांचे कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये रोष व्यक्त केला होता.
ऑर्बिट हॉस्पिटल व्यवस्थापन कडून सिव्हिल लाईन्स पोलिसांना बोलविल्याची माहिती समोर आली होती समीर च्या नातेवाईकामध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे बोलले जात आहे. समिरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल व डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समीर चे आजोबा दादाराव वानखडे यांनी केले आहे ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा रुग्ण नातेवाईकांकडून होत आहे. समीर संदीप भोजने याच्यावर उपचारदरम्यान हलगर्जी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे अतिशय हलाकीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी आहेत त्यांनी समीरच्या उपचाराकरिता शेत गहाण ठेवत समोर उपचार सुरू केले तसेच समीरच्या उपचारासाठी गावस्तरावर वर्गणी गोळा करण्यात आली होती.
या योग्य उपचारा मिळून समीरचा जीव वाचणार अशी ही आशा सर्वांना होती पण ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमतरतेमुळे कमी प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ द्वारे हॉस्पिटल मध्ये लहान बालकांवर उपचार होत होत असल्याचा आरोप रुग्ण नातेवाईकांनी केला आहे. नर्सिंग स्टाप च्या माध्यमातून उपचार आणि हॉस्पिटल चालविले जात असल्याचा समीरची तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून हॉस्पिटल व्यवस्थापनाची चूक असल्याचे आरोप समीर चे वडील संदीप भोसले यांनी केले आहे. लवकरच याविषयी हॉस्पिटल विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समीरच्या वडिलांनी सांगितले आहे.