अखेर पेन्शन घोटाळ्यातील बांगड बिल्ल्यावर गुन्हा दाखल
दबंग आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत
अकोला :- अकोला महानगरपालिकेत पेन्शन घोटाळ्याची माहिती सर्वात प्रथम सत्य लढा ने प्रकाशित केल्यामुळे करोडो रुपयाच्या घोटाळ्यात आयुक्तांनी उपायुक्त प्र गिता ठाकरे यांच्या चौकशीत अशोक सोळंखे यानी 1,27,26,927 रुपयाचा अपहार केल्याचे आढळुन आल्याने अखेर लेखा विभाग प्रमुख यांनी या बांगड बिल्ल्यावर सिटी कोतवाली येथे 25 जुन 2024 रोजी तक्रार दाखल केली असल्याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सोळंखे वर 207/2024 कलम 409/420 भादवी गुन्हा दाखल केला आहे.
या घोटाळ्याची पाश्वभूमी खुप खोलवर असुन ते पुढील तपासात बाहेर येईल. हा घोटाळा मोडस आपरेडी नुसार म्हणजे गुन्हेगार प्लॅन करुन करतात तशीच पध्दत पेन्शन घोटाळ्यात वापरल्या गेल्याची चर्चा आहे. हा घोटाळा एकट्या सोळंखे ने केला नसुन यामध्ये जंपीग पदोन्नती वाले,लेखा विभाग, ऑडिट विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग याचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. सर्व नियोजन बध्द पध्दतीने साखळीपध्दतीने गेल्या पंधरा वर्षापासून होत होता.प्रशासनाच्या लक्षात न येणे म्हणजे न पचण्यासारखे झाले आहे. आता तपास पोलीस कडे गेल्याने यातील ते अधिकारी कोण? याला सहकार्य करणारे मनपातील अधिकारी कोण?याचा तपास झाल्यास खुप मोठे रॅकेट अकोला मनपात सक्रिय असल्याचे दिसुन येईल.या घोटाळ्याची माहिती सत्य लढा ने प्रकाशित केली तसेच याच्या तळागाळापर्यंत नेण्यास प्रशासनाला भाग पाडले असे सत्य लढाचे संपादक सतिश देशमुख यांना फोन करुन नागरिक आणी अन्यायग्रस्त पेन्शन कर्मचारी धन्यवाद देत आहे.
या घोटाळ्यात आणखीन महत्वाची बाब म्हणजे लेखा विभाग प्रमुखांनी आपल्या तक्रारीत फक्त 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 चा उल्लेख केला असल्यामुळे शंका उपस्थित होत आहे. सोळंखे हा पेन्शन विभागात रुजु झाला तेव्हापासून चौकशी का करण्यात आली नाही? चौकशी ची सुरवात सुरवाती पासुन न करता मागुन का करण्यात आली? याबाबत प्रशासन खुलासा करणार का? अशी मागणी अन्यायग्रस्त सेवा निवृत्त कर्मचारी वर्गाकडून होत आहे.
आता पोलीस तक्रार दाखल झाली पुढे या घोटाळ्यात आणखीन पडद्याआड लपलेले चेहरे उजागर होतात हे पाहणे औतुक्याचे होईल.
म्हणतात न शासकिय रेकार्ड शी कधीही छेडछाड करु नये एक एक दिवस सत्यता समोर आल्याशिवाय राहत नाही तसाच प्रकार मनपातील अधिकारी यांनी केला आहे. प्लाट,घरे,दुकान चल अचल संपत्ती गोळा केली आहे. शासन ती संपत्ती कुर्क करणार का असशील चर्चा अकोला मनपात दबक्या आवाजात सुरु आहे. आता प्रतिक्षा आहे ती या घोटाळ्यात आणखीन किती बांगड बिल्ले आहेत ते पाहण्याची. लवकरच पोलीस तपासात समोर येईल.