चक्क ग्रामसेवकांला दिली मारण्याची धमकी
पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बुद्रुक येथील ग्रामसेवक सागर रोठे यांना भ्रमणध्वनीवर जिवे मारण्याची धमकी आल्याने. सर्वत्र खळ बळ माजली हकीकत अशी की कामगाराचा प्रस्ताव व इतर कामासाठी ग्रामसेवकावर दबाव आणून सही करण्यासाठी सुधाकर दिनकर मोरे यांनी फोन लावून ग्रामसेवकाला मारण्याची धमकी दिल्याचे ग्रामसेवकांनी पोलीस स्टेशन पातुर ला तक्रारीत नमूद केले आहे सदर तक्रार देऊन पातुर पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 507 नुसार गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पातुर पोलीस करत आहेत.