अकोला ब्रेकिंग
अकोला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात बार मालकांचे ठिय्या आंदोलन.
मनमानी कारभारामुळे बार बंद
उत्पादन शुल्क कार्यालयाच्या विरोधात शहरातील सर्व बार बंद. ठेवण्यात आले होते सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादक शुल्क यांच्या चुकीच्या व मनमानी कारभारामुळे बार बंद ठेवण्यात आले आहेत.अवैध दारु विक्री, धाबे, अवैध दारु पाजणे व बुटलिंकींग इत्यादी विषयावर यापूर्वी दिलेल्या निवेदनाचे आधारे कोणतीही समाधानकारक कार्यवाही न झाल्याने सर्व अनुज्ञाप्ती धारकांना व्यवसाय करुन लायसन्स फी भरणे सुध्दा कठिण झाले आहे, अशी वास्तविक स्थिती बाबत चर्चा व निवेदन दिले असता सर्व अनुज्ञाप्ती धारकांना बधमकी देऊन तुम्ही तुमच्या अडचणी स्वतः वाढवून घेत आहात व आमचे समक्ष त्यांचे अधिकारी यांना तोंडी आदेश देवून अनुज्ञाप्ती धारकांना कायद्याचा आधार घेवून अनुज्ञाप्ती धारकाला प्रत्यक्ष व्यवसाय करणे मुश्किल होईल, अशा आशयाचे निर्देश देवून धमकी मिळाल्याने अनुज्ञाप्ती धारक सदर धमकी निषेध नोंदवून अनुज्ञाप्ती बेमुदत बंद करुन चाब्या कार्यालयाला अर्जासोबत सुपूर्द करण्यात आल्या यावेळी अकोला जिल्हा वाईन बार व बिअर बार असोसिएशन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.