१ जुलै २०२४पासुन नविन कायदे अस्तिवात

१ जुलै २०२४पासुन नविन कायदे अस्तिवात

२३ फेब्रुवारी, २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसुचने नंतर डिसेंबरमध्ये नवीन कायदयांना मंजुरी मिळाली असुन भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे ०१ जुलै २०२४ पासुन लागु होणार आहेत. नवीन कायदयानुसार अनेक गुन्हयांच्या कलमामध्ये बदल झाला आहे. अदलखपात्र गुन्हा, दुखापत, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, खुन करणे, कटकारस्थान करणे, चोरी व दरोडया सारख्या गुन्हयांच्या कलमात बदल झाला आहे.

नवीन कायदयामध्ये बदल करण्यात आले नुसार अकोला जिल्हयातील सामान्य नागरीक यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळेचे आयोजन करून विविध शासन निर्णय तथा मा. पोलीस महासंचालक यांचे नवीन कायदयानुसार परिपत्रके तसेच नमुद तीन कायदयात जे बदल करण्यात आले आहेत त्याबाबत प्रशिक्षण, नवीन कायदा पुस्तिका संबंधीत सर्व माहिती तसेच CCTNS प्रणाली मध्ये जे बदल करण्यात आले आहेत त्याबाबत अकोला पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दि. ०१ जुलै २०२४ पासुन अंमलात येणा-या तीन नवीन कायदया बाबत अकोला पोलीस दल सज्ज झाले असुन ०१ जुलै २०२४ पासुन अकोला जिल्हयात तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदयाप्रमाणे कामकाज करण्यात येणार असुन अकोला पोलीस दल अविरत जनेतेच्या सेवेस तप्तर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news