नवल केडीया दरोड्या प्रकरणी पोलिसांनी तयार केले स्केच!

नवल केडीया दरोड्या प्रकरणी पोलिसांनी तयार केले स्केच!

स्केच मधील व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर!

जिल्हा अकोला पोलिस घटकातील पोलिस स्टेशन खदान अंतर्गत अपराध क्रमांक ५२१ / २४ , कलम ४५२ , ३९२ , ३९७ , ३४ भादंविअंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन , तक्रार करते नवल केडीया , रा . आळशी प्लाॅट , अकोला , जिल्हा अकोला ह्यांची तोंडी तक्रारीवरुन दिनांक २७ / जून ला रात्री अंदाजे ११ वाजता त्यांचे घरात ०४ अज्ञात ईसम घुसुन , फिर्यादी ह्यांना चाकुचा व बंदुकीचा धाक दाखवुन त्यांचे घरातुन जबरी चोरी करुन नगदी व सोन्या – चांदीचा ऐवज असा एकुण रु . ५७ , ००० /- हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला . तपासामध्ये फिर्यादीने अज्ञात ईसमांच्या दिलेल्या वर्णनाप्रमाणे दोन स्केच तयार करण्यात आलेले असुन , ते सोबत जोडण्यात आलेले आहे . करीता जनतेला आवाहन करण्यात येते की नमुद स्केचमधील वर्णनासारख्या अज्ञात ईसम आपल्या आजु – बाजुला अथवा परीसरात आढळुन आल्यास , नमुद केलल्या पत्यावर माहीती देण्यात यावी . व सदरची नोट सार्वजनीक माध्यमांवर जास्तीत जास्त प्रसारीत करण्यात यावी . नमुद ईसमांची माहीती देणा-या माहीतगाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येऊन , त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल . तसेच माहिती देणाऱ्याचे नाव हे गुप्त ठेवण्यात येणार आहे अधिक माहिती पोलिस स्टेशन खदान , जिल्हा अकोला .
१.) श्री . गजानन धंदर , पोलिस निरीक्षक , पोलिस स्टेशन खदान , मो . क्रमांक ९८२३२३६०३४ .
२.) श्री . निलेश करंदीकर , सहा . पोलिस निरीक्षक , पोलिस स्टेशन खदान , मो . क्रमांक ८९९९१३२६२६ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news