मुलीस फूसलावून पळवून नेणाऱ्या आरोपीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद..!
———————————-
प्रतिनिधी मुर्तीजापुर
शाम वाळस्कर
मूर्तिजापूर :- तालुक्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विरवाडा येथील एका मुलीस गावातीलच मुलाने फूसलावून पळवून नेल्याची घटना २४ मे च्या मध्य रात्री च्या सुमारास घडली.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विरवाडा, ता. मूर्तिजापूर येथील दिवाकर भानुदास गवई वय ४२ यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादी नुसार २४ मे २०२४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास जेवण आटोपून गावातील लाईट नसल्याने दिवाकर गवई व त्यांच्या परिवारातील सदस्य पत्नी, मुलगा व मुलगी हे सर्व घराच्या टेरिस वर झोपायला गेले असता दुसऱ्या दिवशी २५ मे च्या सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिवाकर गवई यांच्या पत्नी झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना फक्त मुलगाच झोपलेला असल्याचे दिसून आला. मुलगी घरात कुठेही दिसून आली नाही मुलीचा गावात तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता कुठेही ठाव न लागल्याने अखेर दिवाकर भानुदास गवई यांनी २६ मे २०२४ रोजी माझी मुलगी २४ च्यामध्य रात्री पासून दिसत नसून तिचा शोध घेऊनही सापडली नसून गावातीलच गोकुळ रामकृष्ण चव्हाण वय २२ वर्ष या युवकाने माझ्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारी वरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अप. क्र. २२३/२४ कलम ३६३ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करून आपले चक्र फिरवीत तपास घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हातील पीडित मुलगी व आरोपी गोकुळ चव्हाण यांचा शोध घेत असतांनाच संशयित मोबाईल क्रमांकाचे सी. डी. आर व एस. डी. आर व टॉवर लोकेशन तपासून केलेल्या तांत्रिक तपासादरम्यान आरोपी गोकुळ याचे लोकेशन टेमघरपाडा ता. भिवंडी जि. ठाणे येथे दिसून आल्याने तात्काळ मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची एक तुकडी टेमघरपाडा येथे रवाना करण्यात आली. सदर लोकेशन वर पोहचताच साध्या वेशात परिसराची पाहणी करून प्राप्त लोकेशन ठिकाणी आरोपी गोकुळ चव्हाण व पीडित मुलीचा शोध घेतला.व आरोपी व पीडित मुलीस ताब्यात घेऊन मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ला हजर करण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे,