महावितरणच्या निष्काळजीपणामुळे बैलजोडी चा मृत्यू!
कंपनीने वेळोवेळी रोहित्रांची तपासणी करणे गरजेचे..
अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी हरीदास सदाफळे हे बळीराम नाठे यांच्या शेतातून शेतीचे काम करुन घरी जात असताना भुईकुड विद्युत रोहित्रजवळ साचलेल्या पाण्यात शॉक लागून बैल जोडी जागेवरच ठार झाली. सुदैवाने बैगाडीतून कोरड्या जागेवर उडी घेतल्याने शेतकरी हरिदास सादाफळे थोडक्यात बचावले, मात्र बैलजोडी दगवल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने वेळोवेळी रोहित्रांची तपासणी करणे गरजेचे असते मात्र, याकडे कर्मचारी दुर्लक्ष करतात आणि ग्रामीण भागात अश्या प्रकारच्या दुर्घटना घडतात, अश्या घटना रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.