केडीया दरोडा प्रकरणातील कुख्यात गुंड हेमंत लुनिया याला अटक!
“केडीया दरोडा प्रकरण मध्यप्रदेश मधिल कुख्यात रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार हेमंत लुनिया यास अकोला स्थानीक गुन्हे शाखा अकोला ने इंदौर येथून गुन्हयात वापरलेल्या ईरटीगा कार सह अटक ”
कुख्यात गुंड हेमंत लुनिया याचे विरूध्द मध्यप्रदेश राज्यामध्ये खुन करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विकी पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण २१ गुन्हे दाखल आहेत.
दिनांक १०/६/२४ रोजी वर नमुद आरोपी याचे त्याचे साथीदारासह, इंदोर परिसरातील मंबई ते दिल्ली BPCI
(भारत पेट्रोलीयम) ची पाईप लाईन फोडून त्यामधून मोठ्या प्रमाणात डिझेल ची चोरी करून फरार होवून नाशिक
येथे आला होता. येथेच रचला केडीया दरोड्याचा प्लॅन (कट) सदर गुन्हयात तीन आरोपी अटक झाल्याबाबत आरोपीस माहीती मिळाल्याने त्याचे दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्यास अटक करणे आव्हानात्मक होते.
आरोपी कडून केडीया दरोडा प्रकरणात वापरलेले वाहन मारूती कंपणीचा पांढऱ्या रंगाची ईरटीगा कार जिचा क्रमांक MP-09-ZM-8468 जप्त.
दिनांक २७/६/२०२४ रोजी न्यु आळशी प्लॉट अकोला येथील रहिवासी नामे नंदकिशोरा अमृतलाल केडीया यांचे घरात अज्ञात लोकांनी दरोडा टाकुन त्यांचे घरातुन नगदी रूपये आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवून गेले होते अश्या रिपोर्ट वरून पो. स्टेखदान अकोला येथे अप.नं ५२१/२०२४ कलम ४५२,३९२,३९७,३४ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.
सदर गुन्हयात यापुर्वी पोलीस स्टेशन खदान येथील पोउपनि मुकूंद देशमुख पो. हया निलेश खंडारे यांनी आरोपी नामे पुष्पराज यास सुरत येथून अटक केली होती. तसेच स्थानीक गुन्हे शाखा अकोला ने सदर गुन्हयात पोलीसांचा गणवेश धारण करून आपण पोलीस असल्याची बतावनी करणारा आरोपी नामे विनायक उर्फ विक्की दिलीप देवरे वय ३४ वर्ष रा. सावरकर नगर मनमाड जि. नाशिक यास मनमाड येथून तसेच सचिन अशोक शहा वय ३८ वर्ष रा. पंचवटी नाशिक असे दोघांना शिताफीने ताब्यात घेवून पो. स्टे खदान यांचे ताब्यात देण्यात आले होते.
सदर गुन्ह्यातील वाहन व ईतर आरोपीतांना तात्काळ अटक करणे बाबत पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळेक यांना आदेशीत केले असता त्यांनी पुन्हा एक पथक गठीत करून त्यांना गुन्हयात वापरलेले वाहन आणि ईतर आरोपीतांचा शोध घेणे कामी खाना करण्यात आले होते. पथकाने त्याचे गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषना व्दारे आरोपी नामे हेमंत पुनमचंद लुनिया वय ४८ वर्ष रा. नावदा ता. महू जि. इंदौर यास शिताफीने अटक करूण त्याचे पासुन गुन्हयात वापरलेले मारूती कंपणीचा पांढऱ्या रंगाची ईरटीगा कार क्रमांक MP-09-ZM-8468 जप्त करण्यात आली असून आरोपीस व जप्त कार पुढील तपास कामी पो. स्टे खदान यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोगरे , पो.नि शंकर, शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोउपनि, गोपाल जाधव, पो, अंमलदार, अब्दुल माजीद सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे, गोकूळ चव्हाण, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, स्वप्नील खेडकर, चालक पी. हवा प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे यांनी केली आहे.