अकोल्या शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर!
अकोला शहरातील वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आल्यामुळे नदीची पातळी वाढली आहे तसेच मोर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या सेतू पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच प्रशासनातर्फे नदीकाठीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेल्या 22 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी काम असल्यास बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे.