अकोला मनपा आवारात टमरेत आंदोलन
मलकापूर खडकीवासियांचे मनपा आवारात टमरेट आंदोलन!
अकोला महापालिकेत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महापालिका आवारात नागरिकांसह अनोखं टमरेट आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. अकोला महापालिकेतील प्रभाग कं. १४ मधील मलकापूर-खडकी रोडवरील जुने गांव येथील सार्वजनिक शौचालयांची तात्काळ दुरूस्ती व साफसफाई करून ते तात्काळ दुरुस्त करण्याकरिता आज सकाळी उभाठा गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महिला नागरिक आणी चिमुकल्यासह मनपा आवारात फिरून संडास द्या संडास द्या अशी नारेबाजी करत टमरेट आंदोलन केले. शौचालय दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.