भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून शिवसेना जिल्हा प्रमुखावर केला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! – आमदार नितीन देशमुख यांचा आरोप
शिवसेना विरोधात भाजप संघर्ष पेटण्याची चिन्ह
अकोला: उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा गुन्हा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केला असल्याचा आरोप आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केला. विधानसभा विधान परिषदेच्या निवडणुका जवळ येत असताना अकोला जिल्ह्यातील भाजप व शिवसेना उभाठा गटातील संघर्ष हा शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तविला जात आहे भाजपचे पदाधिकारी यांना त्या कारणाने शिवसेना उभाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सूड उगवत आहे वैयक्तिक राजकारणाची झालर ओढून हे कट कारस्थान संपूर्ण जिल्ह्यात सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. आज शनिवार दिनांक 13 जुलै रोजी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देत संबंधित होण्याची चौकशी न करता गोपाल दातकर वर गुन्हा का दाखल केला. तसेच घटनास्थळाचे फुटेज बघून गुन्हा दाखल कराव्यास होता असे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातून काँग्रेसपेक्षा भाजपच्या उमेदवाराला अत्यल्प मतांची टक्केवारी असल्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या पदरात पडतो की काय अशी भीती भाजपच्या नेते मंडळींना पळली असून यामुळेच महाविकास आघाडीच्या प्रामुख्याने शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना खोट्या कारवायाच्या अनुषंगाने त्रास देण्यात येत असल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र तो आमदार कोण याबाबत आमदार नितीन देशमुख यांनी बोलणे टाळले. तो आमदार लवकरच मीडियासमोर येणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सत्य लढा सोबत बोलताना सांगितले.