पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या डोहात बुडून एकाचा मृत्यू !

पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या डोहात बुडून एकाचा मृत्यू !


पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या डोहात अकोला येथील एका 19 वर्षे वयाच्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी दुपारी 1 वाजता मयताचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून वर काढला आहे.
पातूर तालुक्यातील धोदाणी धबधब्याच्या परिसरामध्ये अकोला येथील काही तरुण पर्यटनासाठी आले होते. धबधब्यापासून काही अंतरावर निवांत ठिकाणी पाण्याच्या कडेला ते पर्यटनाचा आनंद घेत होते. या तरुणांना पोहण्याचा मोह न आवरल्याने सर्वजण पाण्यात उतरले.

या तरुणांबरोबरच निखिल नंदू पाखरे (वय 18) रा. सरकारी गोडाऊन मागे, अकोला हा सुद्धा पोहोण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस मदतीसाठी धावले. तरुणाचा मृतदेह दुपारी 1 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून वर काढला.
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला. पातूर पोलीस स्टेशनला घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळ पंचनामा पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबेकर मेजर, पो.कॉ. सचिन पिंगळे यांनी केला असून घटनेचा अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

या घटनेत सदर मृतक हा पोहताना डोहाच्या कपारीत अडकला होता, सोबत त्याचे मित्र असून देखील त्यांना या प्रकाराबाबत काहीच माहिती पडले नव्हते बराच वेळ होऊन सुद्धा मृतक निखिल पाखरे दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली व पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दिली. पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल दीड तास शोध घेतल्यानंतर स्थानिक युवक गजानन प्रकाश करवते व मंगेश महादेव नाईक यांनि सदरचा मृतदेह बाहेर काढला, यावेळी माजी सरपंच सुभाष खिल्लारे गोंधळवाडी व पोलिस पाटील वामन भोकरे यांनी मदत केली.धोदाणी धबधब्यावर पर्यटन करताना तरुणांनी निसर्ग न्याहा अतिउत्साहीपणा न दाखवता धोदाणी धबधब्याचे शांततेत पर्यटन करण्याचे आवाहन पातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news