मृतक वडिलांच्या नावाने असणाऱ्या बँक खात्यात करोना काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल!

मृतक वडिलांच्या नावाने असणाऱ्या बँक खात्यात करोना काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या दारू विक्रेता व बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पुत्राची मागणी

अकोला-11 वर्षांपूर्वी मयत झालेल्या वडिलांचे बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटी केवायसी करून बनावट बँक खाते चालवून त्यात करोना नोटबंदीच्या काळात तब्बल 27 कोटी रुपयांचा भरणा करून आपल्या मृत पावलेल्या वडिलांची व कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर गुन्हे नोंदवून फौजदारी कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या पुत्राने पत्रकार परिषदेत केली.शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणातील मृतकाचे पुत्र अमित पुरुषोत्तम गावंडे
यांनी आपल्या कुटुंबाची झालेल्या फसगतीची माहिती दिली.आपले वडील स्व. पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे रा. कळाशी ता.दर्यापूर, जि. अमरावती यांच्या नावाने गांधी चौक येथे देशी विदेशी दारू विक्रीचे विदर्भ वाईन शॉप असून दारू विक्रीची अनुज्ञप्ती असलेल्या आपल्या वडिलांनी रामदास पेठ येथील रहिवासी राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याला सदर दुकान चालवण्यासाठी सन 1987 साली भागीदार म्हणून घेतले होते. भागीदारी पत्राप्रमाणे व्यवस्थापक म्हणून राजेंद्र जयस्वाल हेच दुकानाचा संपूर्ण व्यवहार बघत होते.दि.12 फेब्रुवारी 2000 रोजी माझे वडिलांचे निधन झाले.आम्हा सर्व वारसांना माझ्या वडिलांच्या नावे सुरु असलेल्या सदर अनुज्ञप्तीची किंवा त्या संबंधी कुठल्याही व्यवहाराची कुठलीही माहिती नव्हती. आपणास अचानक अकोला अर्बन को. ऑप. बँक लि., मुख्य शाखा अकोलाचे दि. 10.05.2021 रोजीचे पत्र मिळाले ,ज्यात विदर्भ वाईन शॉप, गांधी चौक अकोला यांचे त्यांच्या बँकेत असलेले खाते क्र.10010220 00468 हे सुरु असून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आपले वडील स्व. पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचे केवायसी कागदपत्रे जमा करणे अनिवार्य असल्याचे नमूद केलेले होते. माझे वडिलांचे सुमारे २२ वर्षांपासून निधन झाले असून सुद्धा त्यांच्या नावे बैंक खाते विना केवायसी सुरु होते. मृतक वडिलांच्या नावे सुरु असलेल्या सदर खात्यासंबंधी विस्तृत माहिती घेण्या करिता आपण दि.5 जुलै 2024 रोजी अकोला अर्बन को. ऑप. बँक लि., मुख्य शाखा अकोला यांना विनंती पत्र दिले. सदर पत्राच्या उत्तरात त्यांनी मला सदर खात्याशी संबंधित सुमारे २ पानांची सर्वसाधारण माहिती त्याच दिवशी पुरवली.सदर बँकेने पुरवलेल्या माहितीचे अवलोकन केले असता अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या असून आपल्या कुटूंबाची मोठी फसवणूक झाली असल्याचे अमित गावंडे यांनी सांगितले.यात राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल व त्यांचा मुलगा शांकी राजेंद्र जयस्वाल व अकोला अर्बन को. ऑप. बँक लि., अकोलाच्या अधिका-यांनी संगनमत कट रचून मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप अमित गावंडे यांनी केला.सदर खात्याचे मुख्य खातेदार म्हणून असलेले आमचे वडील स्व. पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचे सदर खाते उघडण्याच्या आधीच सुमारे 11 वर्षांपूर्वी म्हणजे दि. 12 फेब्रुवारी 2000 रोजी निधन झालेले असून व सदर बाब राजेंद्र जपस्वाल व त्यांच्या मुलाला माहित असून सुद्धा त्यांच्या नावे हे संयुक्त खाते विदर्भ वाईन शॉप या नावाने उघडल्या गेले.सदर खात्याचे मुख्य खातेदार हे वर्षांपूर्वीच मृत झालेले असतांना त्यांच्या नावे फर्मचे
संयुक्त खाते, बनावट कागदपत्रे तयार करून उघडल्या गेली आहेत.तसेच सदर खाते उघडण्याच्या वेळी बँक व्यवस्थापका समोर प्रत्यक्ष करायची सही कोणत्या भलत्याच माणसाला उभे करून केली गेलेली असून
हे खाते उघडण्याच्या वेळी आपल्या वडिलांनी फॉर्म 60 जमा केला असे त्या कागदपत्रांवर नमूद केलेले आहे.वास्तविक वडिलांचा सदर फॉर्म 60, हा त्यांच्या निधना नंतर तब्बल 11 वर्षांनी त्यांच्या बनावट सह्या करून सादर केला गेला आहे.या खात्याची संपूर्ण केवायसी ही 28 ऑक्टोबर 2013 ला केलेली दिसून येत असून सन 2013 नंतर पुन्हाकेवायसी ही करायची कागदपत्रांमध्ये दि.28 ऑक्टोबर 2015 अशी नमूद केलेली आहे.याचा अर्थ सदर खाते हे सन 2015 पासून विना केवायसी सुरु आहे, यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या केवायसी संबंधीच्या निर्देशांचे सुद्धा स्पष्ट उल्लंघन झाले असुन नोटबंदी काळात या खात्यात नगदी भरणा 27,06,22,500 एवढा झाला असून
सरकारने दि. 8/11/2016 रोजी घोषित केलेल्या नोटबंदी च्या कालावधीत एवढी प्रचंड मोठी रक्कम ही विदर्भ वाईन शॉप, अकोला या फर्मचा शासन तथा इन्कमटॅक्स विभागापासून लपवून ठेवलेला नफा असून नोटबंदीच्या काळात बँकेत आलेल्या 2 लाख पेक्षा जास्त नगदी रकमेबाबत शासनाला तथा इन्कमटॅक्स विभागाला कळवणे अपेक्षित असतांना बँकेने ही अत्यंत गंभीर बाब राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल व त्यांचा मुलगा शांकी राजेंद्र जयस्वाल यांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांचे सोबत कट कारस्थान करून शासनापासून लपवून ठेवली असल्याचा आरोप अमित गावंडे ने यावेळी केला.आपण या संदर्भात सिटी कोतवाली येथे तक्रार दिली असून तक्रारीच्या प्रति गृहमंत्री, पोलीस महासंचालक,पोलीस अधीक्षक यांना पाठविल्या असून संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news