दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मनपा आवारात आंदोलन!
दिव्यांगाच्या विविध समस्याबाबतचे निवेदन करून सुध्दा कुठल्याही प्रकारचे निराकरण करण्यात आले नाही.दिव्यांग कायदा २०१६ न झाल्यामुळे सोमवारी मनपा आवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले
मागील दिनांक १५/जून २०२१ दिनांक १५/जुलै २०२१, दिनांक २८/जून२०२१ दिनांक ७/डिसेंबर २०२२, दिनांक ९/जानेवारी २०२४ दिनांक २४/मे २०२४, दिनांक १५/जुलै २०२४ सतत निवेदन सादर करूनही महापालिकेने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे आंदोलन करण्यात आले.महानगर पालिकेने खालील मागणी पूर्ण करण्याची मागणी यावेळी आंदोलन करताना केली होती
१) दिव्यांगांचा बेरोजगार भत्ता रू. १२००/- ऐवजी १५००/- करण्यात यावा
२. दिव्यांगांना शासनाची जागा उपलब्ध करून त्यावर घरकुलाचे बांधकाम करून देण्यात यावे.
३. दिव्यांग स्वावलंबन होण्यासाठी महानगरपालिका हद्यीमध्ये स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी.
४. महानगरपालिका हद्यीमध्ये दिव्यांग बचत गटामार्फत लहान मोठे कंत्राटी देण्यात यावे. उदा. भंगर, रद्दी पेटींग, लहान मोठे रस्ते, नाले, पार्कींग इत्यादी.
५. दिव्यांग खेळाडुंना खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे व वार्षीक पेन्शन योजना लागू करण्यात यावी व दिव्यांगाना खेळाचे साहित्य वाटप करण्यात यावे.
६. सुशिक्षीत दिव्यांगांना महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीने ५ टक्के जागा आरक्षीत करण्यात यावी.
दिव्यांगाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सहानुभुती न दाखविल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात सोमवार रोजी महानगरपालिकेत आंदोलन केले आंदोलन करते जोपर्यत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही. तोपर्यत आम्ही महानगरपालिकेचा ताबा सोडणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर यांनी घेतली होती. मनपा उपायुक्त वासनकर यांनी आंदोलन चर्चा करून पुढील निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन करते आपल्या आंदोलन मागे घेतले.सै मोईन अली जिल्हाध्यक्ष .अरुणा काकड महीला जिल्हा अध्यक्ष.शे. नाडीर महानगर अध्यक्ष. वंदना घोघरे महीला महानगर अध्यक्ष.मनिषा खेडकर उप अध्यक्ष महीला.शै बदरुद्दीन सचीव. निसार खान जिल्हा उप अध्यक्ष. प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते.