विमा कंपनी शेतात झालेल्या नुकसानीचा परतावा देत नसल्याचा आरोप अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकऱ्यांनी केलाय..या भागातील सुमारे 43 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता मत्र विमा कंपनीकडे केवळ 2 हजार 300 शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असल्याचं विमा कंपनीने म्हटलंय… शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपनी प्रतिनिधी आणि कृषी विभागाची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती..
मात्र या बैठकीत
विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित न राहता त्यांचे कर्मचारी उपस्थित राहिल्याने देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहेय..याआधी अकोल्यात एच डी एफ सी ऍग्रो विमा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आले होते..आज परत देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर पातूर पोलिसात विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्राक्रिया सुरू आहेय..तर विमा कंपनीशी भाजपचे साठे लोटे असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहेय…