भीषण अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

कार च्या जबर धडकेने मोटार सायकल शेतकरी मजूर जागीच ठार

पातूर आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघात पातुर जमदार प्लॉट येथील रहिवासी शेख राजिक व त्यांच्या मुलगा हे मोटार सायकल घेऊन शेतात फवारणी करीता जात होते परंतु नव्याने बनलेला अकोला हैदराबाद मार्ग हा पातुर येथील बायपास असल्याने पातुर करांची शेती ही या बायपासला ला रोडला लागून आहे व या रोडचे सव्हिस रोडचे काम अधुरे असल्याने त्यामुळे शेतकरी बायपास हायवे रोड ओलांडण्याकरिता रोडच्या विरुद्ध दिशेने शेतकरी व मजूर यांना जावे लागते व या रस्त्याचा वापर मजबुरीने करावा लागतो या रोडवर प्रवास करणाऱ्या भरधाव वाहनाच्या चपेट मध्ये येऊन या आधी सुद्धा तिनं ते चार अपघात झाले आहेत जीव गमावले आहेत त्यातलाच हा प्रकार आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडला आहे तर बाळापूर हायवे ते अकोला रोड हा बायपास असून अर्धवट राहिलेल्या सर्विस रोड मुळे विरुद्ध दिशेने जात असलेले शेतकरी मजूर वय वर्ष 42 शेख राजीक हे मोटार सायकल क्र MH 30 AM 5664 आपल्या शेतात फवारणी करीता जात असताना अकोल्या कडून वाशिम कडे जाणाऱ्या MH 30 BB 8294 क्रमांक असलेल्या कार च्या जबर धडकेने जागेवर ठार झाले व त्याचा मुलगा शेख अराण याला पायाला जबर इजा झाली तर मुलाला अकोला येथील जिल्हा आरोग्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले तर शेख राजीक याचा मुतदेह शवविच्छेदना करिता अकोला जिल्हा आरोग्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला या झालेल्या अपघातामुळे पातुर शहरातील नागरिक रोड प्रशासनाविरोधात रोश व्यक्त करत आहेत तर पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शना त pi पोटे व इतर पोलिस कर्मचारी करतं आहेत

प्रेस रिपोर्टर
किरण कुमार निमकंडे
सत्य लढा न्यूज पातुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news