मूर्तिजापूरात परप्रांतीय २६ वर्षीय युवतीची निर्घृण हत्या!

मूर्तिजापूरात परप्रांतीय २६ वर्षीय युवतीची निर्घृण हत्या!

आरोपी फरार ; पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना!

मूर्तिजापूर :- येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रतीक नगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात परप्रांतीय २६ वर्षीय मुलीची तिच्याच सहकाऱ्याने निर्घृण हत्या केल्याची घटना २४ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरात परप्रांतीय २६ वर्षीय युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली, सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. शांतीक्रिया प्रशांत कश्यप २६ वर्ष राहाणार आसाम मृतक युवतीचे नाव आहे. सदर युवती ही आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे याच्या सोबत मुंबई येथून आल्याचे समजते, दोन दिवसांपूर्वी आरोपी चेतन व शांतीक्रिया हे दोघे येथील वैशाली वाईनबारवर काम मागण्यासाठी आले होते. रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करुन दिलेल्या एका घरात, वाईनबारवरील इतर कामगारांसोबत मुक्कामी होते. दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन याने तिच्या डोक्यात वार करुन झोपेतच काटा काढला. बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितले असता शांतीक्रिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तेव्हा तिच्या सोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचे समोर आले. आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, ठाणेदार भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार, स्वप्नील खडे, ज्ञानेश्वर राणे, सचिन दुबे, गजानन खेडकर, भूषण नेमाडे, सचिन दांदळे व फॉरेंसिक पथक श्वानपथक दाखल झाले. अधिक तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.
———————————
प्रतिनिधी शाम वाळस्कर
सत्य लढा न्यूज मुर्तीजापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news