किरण कुमार निमकंडे
सत्य लढा न्यूज पातुर
तालुका प्रतिनीधी
पातूर – येथील पत्रकार मोहन जोशी याना अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार्या पै. खान मो .असगर हुसेन स्मुती सामाजिक एकता उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
मराठी पत्रकार परिषद मुबई संलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने जिल्हातील पत्रकाराना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते शनिवारी पत्रकार भवन येथे आयोजीत एका कार्यक्रमात पातूर येथील मोहन जोशी यांना पै. खा. मो. असगर हुसेन स्मुती सामाजिक एकता उत्कृष्ठ पत्रकारीता करीता सन्मानित करण्यात आले अकोलाचे खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले या वेळी आमदार वंसत खंडेलवाल, माजी मंत्री अजहर हुसेन, सिध्दार्थ शर्मा, शौकत अली मिर साहेब, प्रमोद लाजुरकर आदि मान्यवर उपस्थीत होते पातूर तालुक्याच्या वतीने मोहन जोशी याची निवड करण्यात आली या वेळी उमेश देशमुख, प्रदिप काळपांडे, सतिश सरोदे, संगीता इंगळे, अ. कुद्दुस , नासिर शेख, निखील इंगळे, किरण निमकंडे, राहुल देशमुख आदि पातूर तालुक्यातील पत्रकार उपस्थीत होते