अकोल्यातील भाजप कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली. काल रात्री अकरा ते साडे अकरा वाजता ही घटना घडली,ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते संदीप गावंडे यांच्यासह काही जण कारने
नागपूरहून अकोल्याकडे येत होती. यावेळी अमरावतीजवळ त्यांनी आपली कार विरुद्ध दिशेने टाकली. चालकाच्या चुकीमुळे समोरुन येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरा समोर धडक झाली.यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाले असून भाजप कार्यकर्त्यासह दोघे जखमी झालेत. यामध्ये नकुल तोडकर आणि विजय मदनकार यांचा जागीच मृत्यू झाला संदीप गावंडे आणि मुकेश सरप हे जखमी झालेत.अपघातातील मृत आणि जखमी सर्व जण अकोल्यातील मोठी उमरीभागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.अकोल्यातील भाजप कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली. राँग साईड अर्थात चुकीच्या दिशेने कार घेतल्याने समोरुन येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाले असून भाजप कार्यकर्त्यासह दोघे जखमी झालेत. नागपूरहून अकोल्याकडे येत होती.
यावेळी अमरावतीजवळ त्यांनी आपली कार विरुद्ध दिशेने कार टाकल्यामुळे. चालकाच्या चुकीमुळे समोरुन येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरा समोर धडक झाली. बोलले जात आहे.