प्रतिनिधी शाम वाळस्कर सत्य लढा न्यूज मुर्तीजापुर
मूर्तिजापूर :- येथील हिरपूर रोड वरील परमानंद मलानी शाळे नजिक एका हिरो होंडा सी. डी दिलाक्स चा रस्त्यातील गड्या मुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. २६ रात्री ९ ते १० वाजता च्या सुमारास घडली आहे.
मूर्तिजापूर येथील शुक्रवार आठवडी बाजार करून आपल्या हिरो होंडा सी. डी दिलक्स दुचाकी क्रमांक एम. एच. ३० के. १५७८ ने मूर्तिजापूर वरून शेलूबाजार येथे आपल्या इतर दोन सहकार्यासोबत जात असलेल्या सुधाकर कोंडूजी चव्हाण वय ३५ वर्ष राहणार शेलूबाजार ता. मूर्तिजापूर हे मूर्तिजापूर ते भातकुली रोड वरील परमानंद मलानी शाळे नजिक रस्त्यावरील गड्डाचे रात्रीच्या सुमारास गाडी चालवत असतांना अंदाज न आल्याने गड्ड्यात गाडी उसळून सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले प्रमोद संभाजी सोळंके वय ३७ रा मधापुरी हल्ली मुक्काम गायरन मूर्तिजापूर व वेदांत शंकर सोळंके वय १६ रा. मधापुरी हल्ली मुक्काम गायरन मूर्तिजापूर हे दोघे काका पुतणे गंभीर जखमी झाले. जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु यात डॉक्टरांनी सुधाकर कोंडोजी चव्हाण यांना मृत घोषित केले. तर प्रमोद संभाजी सोळंके व वेदांत शंकर सोळंके या काका पुतण्यास पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आले तर सुधाकर कोंडोजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरनीय तपासणी करिता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस करीत आहे.