कुरणखेड येथील महामार्गावर अपघात अपघातामध्ये बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मोरे यांचा जागेवर मृत्यू

कुरणखेड येथील महामार्गावर अपघात अपघातामध्ये बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मोरे यांचा जागेवर मृत्यू

कुरणखेड – राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज दुपारी घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे

बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र मदन मोरे रा.रिसोड हे आपल्या कर्तव्यावर असताना मूर्तिजापूर येथे आपल्या टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच ३७ ए.बी.४९७५ जात असताना त्यांचा कुरणखेड येथे अपघात झाला आहे अकोल्याच्या दिशेने जात असणारी कार एम एच तीस पि २७८८ या कारणे जबर धडक दिल्यामुळे पोलीस राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे दाखल झाले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहे यावेळी कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक यांनी घटनास्थळी घेऊन मदत कार्य केले आहे यामध्ये पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर, अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शाहबाज शाहा, ईश्वर हरणे, उज्वल कांबे, हर्षल देवरनकर यांनी मदत कार्य केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news