अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे आले होते… अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते… अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला, वाशिम आणि बुलढाणा चे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ता हजर होते.. यावेळी आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचा म्हणत काहीही भाष्य करनं त्यांनी टाळलं आहेय.. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली आहे सोबतच जय मालोकार यांचा जिल्हाध्यक्ष बनण्याचा स्वप्न अपुरा राहिला होता तो अमित ठाकरे यांनी मरणोपरांत पुर्ण केला आहेय…सोबतच या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचा आश्वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिला आहेय…तर राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांना म्हटल आहेय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news