दिल्लीत एका 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. नैराश्यातून या तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही तरुणी मुळची अकोला जिल्ह्याची रहिवासी असून दिल्लीत ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने चिठ्ठी लिहिली आहे.
सॉरी आई बाबा….
अंजलीने लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये तिने आई बाबांची माफी मागितली आहे. “आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही. पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत. प्रत्येकाला हा खर्च परवडू शकत नाही. मी खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. सुसाईट नोटमध्ये अंजलीने तिच्या मावशीला देखील धन्यवाद दिले आहे. तिने तिला नेहमी साथ दिली. सुसाइड नोटमध्ये एक स्माईली काढत तिने आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत. असे आवाहन देखील केले आहे. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे.