डॉ.सौ.संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात 2005 पूर्वीच्या जुन्या पेंशनच्या बेमुदत आठवण आंदोलनाचा आज पाचवा दिवस दिवस
कोरोना काळात शिक्षक बांधव मृत पावले, सेवानिवृत्त शिक्षकांची 2 पैशासाठी पायपीट सुरू आहे, प्रशासनानेच शिक्षकांची जुनी पेंशन हिरावली – डॉ.सौ.संगीताताई शिंदे
शेगाव
संजय तायडे
प्रतिनिधी सत्य लढा
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची 1982 ची जुनी पेंशन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही 7 ऑगस्ट रोजी होणार आहे,शासनाने अद्यापपर्यंत शपथपत्र दाखल न केल्यामुळे शेगाव येथे शासनाने न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण सुरू आहे, परंतु शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाच्या नेत्या डॉ.सौ.संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील पेंशन पीडित शिक्षक व शिक्षीका महीलांनी रविवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेगाव येथे चक्का जाम आंदोलन छेडले व सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. भर पावसात जिवाचीही पर्वा न करता हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचे रूप पाहता शेगाव पोलिसांनी आज डॉ.सौ.संगीताताई शिंदे यांच्यासह अनेक पेंशनपीडित आंदोलकांना अटक केली.
आंदोलकांनी पोलीस ठाण्यातच घोषणा बाजी सह प्रशासन विरोधातील रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची 12 जुलै रोजीची घोषणा व 18 जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद यानुसार सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर न केल्यास भविष्यात आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ.सौ.संगीताताई शिंदे यांनी दिला आहे.