दुचाकी च्या धडकेत दोन मुले गंभीर जखमी!
अकोला प्रती – अकोट फैल मधील एम सादिक हार्डवेअर, अकोट रोड, अकोला समोर एका मोटारसायकल ॲक्टिव्हा स्वाराने दोन मुलांना धडक देऊन पळ काढला ही घटना सकाळी 6 वाजता घडली आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने ही दोन मुले त्यांच्या घराजवळील शेडवर बसली असताना अचानक ॲक्टिव्हाने त्यांना चिरडले आणि दुचाकी मागे सोडून पळून गेला.
नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने बंदोबस्तं तैनात असलेले पोलीस कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले आणि मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची चितांजनक असुन मोटारसायकलच्या डिक्की मध्ये पोलिसांना दोन छायाचित्रे सापडली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने नंबरप्लेट नसतानाही फिरत असतात, त्यामुळे अपघात टाळता यावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.