अखेर श्रावणी देशमुख मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आढळून आली!

अखेर श्रावणी देशमुख मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आढळून आली!
अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक!

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांगी डाबकीरोड परिसरातील अपहृत अल्पवयीन बालीकेस आरोपीसह भोपाल मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. अपहृरण बालीकेचे नातेवाईक व डाबकीरोह वासी यांनी दिनांक १२/०८/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालायावर मोर्चा
काढून बालीकेचा शोध घेण्याबाबत निवेवण दिले होते. घटनेच्या नंतर अपहृत बालीकेचा पालकांनी पो. नि. शंकर शेळके स्था.गु.शा. यांचे कार्यालयात भेट घेवुन घटनेची माहिती देवुन बालकीचे शोध घेण्यासाठी विनंती केली होती, परंतु बालकीचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेली कोणतेही पुरक माहिती पालकाकडे उपलब्ध नव्हती. बालीका स्वतः मोबाईल वापरत नसल्याने व कोणत्याही व्यक्तीवर पालकांचा संशय नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती.प्रकरणाची संवेदनशीलता पाहता स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गोपनिय रित्या बालीकेचे वास्तव्य असलेल्या भाग शाळा, ट्युशन, घराचा परिसर ईतर ठिकाणावरून माहिती गोळा करीत होते.
पिडीतेची आई वडीलांकडे वेगवेगळी चौकशी करून स्था. गु.शा. अकोला पथकाने महत्वपुर्ण माहिती गोळा केली होती. गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषनावरून दिनाक १२/०८/२०२४ रोजी संशयीत आरोपी भोपाल येथे असल्याची खात्री झाल्यावर सायंकाळी पिडीतेच्या वडीलांसह स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथक भोपाल मध्यप्रदेश येथे खाना करण्यात आले होते.
भोपाल मध्यप्रदेश येथुन अपहृरण बालीकेची सुटका करून आरोपी अटक आव्हा नात्मक होते कारण त्यांचे निच्चीत ठिकाणाची माहिती नव्हती स्था.गु.शा. पथकाने तांत्रीक माहितीच्या आधारे कौशल्यपुर्वक तपासकरून दिनांक १३/०८/२०२४ रोजी भोपाल मध्यप्रदेश येथे दिवसभर सापळा रचुन पिडीत व आरोपी यांना सुखरूप ताब्यात घेवुन अकोला येथे आपले,ताब्यात घेण्यात आलेला आरोपी विक्की ओमप्रकाश साकला वय २८ वर्ष हा फिर्यादीचे घरासमोरच वास्तव्यास होता. तो पिडीतेशी तिची जन्म तारीख वाढवुन लग्न करण्याचे तयारीत होता. असे स्था.गु.शा. चे तपासात आले आहे. त्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील पिडीतेची नावाचा जन्मदाखला देखील तयार करयाचा प्रयत्न केला आहे.अपहृरण बालीकेचे पालक व डाबकीरोड वासी यांनी निवेदन देताना सदर प्रकरणात अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या होत्या व आरोप केले होते. परंतु आज अपहृत बालीका सुखरूप वडीलांच्या ताब्यात मिळाल्याने सर्व शंका कुशंकांना पुर्ण विराम मिळाला.पुढील कारवाई पो. स्टे. डाबकीरोड पोलीस करित आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अकोला, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार खुशाल नेमाडे, अभिषेक पाठक, फिरोज खान, सुलतान पठाण, महेंद्र मलिये, आकाश मानकर, धिरज वानखडे, स्वप्नील खेडकर, मोहम्मद आमीर, स्वप्नील चौधरी सायबर शाखेचे पो.अं. गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news