किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर वन विभाग अंतर्गत येणाऱ्या 16 मैल परिसरात वन्य प्राणी संचार करतात यामध्ये सांबार, रानटी डुक्कर, हरणे ,रोही यासारख्या अनेक प्राणी संचार करतात तर हे प्राणी अकोला हैदराबाद नव्याने बनलेल्या रोड क्रॉस करून विरुद्ध दिशेने संचार करतात तर हा परिसर पहाडी असून अनेकदा या रोडवर हरणे व रोही यांचे अपघाताच्या घटना घडल्या आहेत . तर यावेळी दुर्मिळ होत असलेले बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले आहे. यावेळी पातुर शहरातील व परिसरातील नागरिकांनी विभागाच्या वतीने या परिसरात वन्य प्राण्यांचे संचार असल्याचे फलक लावण्याची मागणी होत आहे .तर घटनेची माहिती मिळताच पातुर वन विभागाचे वन अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाच्या वाहनांमध्ये जागेवर मृत्यू पावलेल्या बिबट्याला अकोला जिल्हा वन्य चिकित्सालयामध्ये विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे तर पुढील तपास पातुर वनविभाग मुख्याधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल करीत आहेत