आमदार देशमुख यांच्या मुलावर हल्ला!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. या हल्लादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली. आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण आंबेडकर नगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे. पृथ्वी देशमुख याच्यावर हल्ला का केला? याबाबत तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news