अकोल्यात दोन गटात दगडफेक परिस्थिती नियंत्रणात?
अकोल्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन गटाने एकमेकांवर दगफेक करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते आमने-सामने येताना दिसत आहे अशीच घटना
मागील वर्षी घडली असून आता पुन्हा ही घटना घडली आहे. अकोल्यातील जुने शहर परिसरातील हरिपेठ परिसरात घडली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून जमावाला पांगवण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे.