राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. शुभम लोणकर या फेसबूक अकाउऊंट वरुन पोस्ट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्वीस्ट आला असून या प्रकरणी अकोला कनेक्शन समोर आले आहे !. जबाबदारी घेतल्याची पोस्ट शेअर केलेला शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केला जात आहे.
शुभम लोणकर इतिहास लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं होते. तेव्हा 6 जणांसह 3 बंदूक, 14 जिवंत काडतूस जप्त केल्या..
या संपूर्ण तपासात अकोला पोलिसांनी 3 बंदूक 14 जिवंत काडतूस आणि काही मॅक्झिन्स जप्त केल्या आहे. ही कारवाई कार्यवाही IPS अनमोल मित्तलसह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके केली होती. तेव्हा शुभम लोणकर यांच्यासह अंकुश गायबोले (वय 30), रोहित कोकाटे (वय 25) आणि अक्षय अरबाड (वय 26) यांना देखील अटक झाली होती.अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. ‘तो’ गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहर पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होते. त्याची या प्रकरणी जामिनावर सुटका झाली होती. आता बाबा सिद्दीकी प्रकरणी अकोला पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.