ब्राम्हण समाजाचे भाजपचे सच्चे कार्यकर्ते गिरीश जोशी यांचा भर सभेत केला अपमान!
भाजप उमेदवार यांचा होत आहे तीव्र निषेध!
अकोला- महायुतीच्या अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अकोल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानावर झाली या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा भेट देतांना मंचावर उपस्थित ब्राम्हण समाजाचे तसेच भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांचा भर सभेत अकोला पश्चिमचे च्या उमेदवाराने सच्चा व प्रामाणिक कार्यकर्त्याचा अक्षरशः हात झटकून अपमान केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. कालच माझी महापौर अश्विनी हातवळणे यांनी पत्रकार परिषद घेत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केला होता . आजच्या सभेत त भाजपचे प्रसिद्धी प्रमुख ब्राह्मण समाजाचे गिरीश जोशी यांच्यासोबत झालेला हा अपमान समस्त ब्राह्मण समाजाचा झाल्याचे बोलले जात आहे. याला निवडणूकीची झालर असल्याचे बोलल्या जात आहे. सदर सदर उमेदवाराचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे गिरी जोशी यांनी अकोला पश्चिम मतदार संघात उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी कुठलीही नाराजी न ठेवता भाजप पक्षासाठी याच उमेदवारासाठी काम करत आहेत मात्र या उमेदवाराने त्यांचा हात झटकल्याने ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा अकोल्या शहरात होत आहे. याविषयी भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद दाखवत होता.