अकोल्यात एक कोटीच्या जवळपास नकली नोटा जप्त!
अकोल्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील महाबीज येथे एका व्यक्तीला नकली नोटाचा व्यवहार करताना पकडण्यात आले. दरम्यान देवानंद जवळे व इतर दोघांच्या मदतीने एका व्यक्तीला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत भारतीय चलना मधील पाचशे रुपयाच्या नकली नोटांचा गैरव्यवहार करताना पकडले. दरम्यान या सर्व एक कोटीच्या जवळपास नकली नोटा असल्याची बाब समोर येत आहेत. यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची विचारणा केली असता चौकशी करून कळवतो. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये आणखी टोळीने नकली चलनी नोटाचा व्यवहार केला का ही बाब तपासात समोर येणार आहे.