पोपटखेड येथे अल्पवयीन चालकाने घेतला युवकाचा बळी!
अकोट पोलीस व महसूल विभागाच्या कारणाने गेला युवकाचा बळी!
अकोट पोपटखेड मार्गावर चालणारे टिप्पर वर अल्पवयीन मुले चालक असून यांच्या कडे लायसन्स पण नसतात तसेच सतत फोनवर बोलणे,मद्यधुंद होऊन दररोज 5 ट्रीप मारायच्या नादात असे अपघात घडत असुन अनेक परीवारा या लोकांनी उघड्यावर आणले आहेत, पोपटखेड येथील नाजीम नामक युवक अत्यंत गरीब परीवारातील असून आज त्याचा परीवार या घटनेनंतर उघड्यावर आला आहे..!यावर आकोट महसूल विभाग पोलीसांनी योग्य ती कारवाई करुन अशा घटनांना आळा बसेल अशी कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत..!