सिव्हिल लाईन परिसरात भीषण अपघात: त्रिवेणी चौकात कंटेनर, कार आणि दुचाकीची जोरदार धडक, तीन जखमी

अकोला: सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाजवळील त्रिवेणी चौकात दुपारी २:३० वाजता उड्डाणपुलावर रॉंग साईडने वाहन चालवल्यामुळे मोठा अपघात घडला. या अपघातात कंटेनर, कार आणि दुचाकीचा समोरासमोर धक्का बसून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/DEcPADrTpEY/?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=MzRlODBiNWFlZA==https://youtube.com/shorts/2suNRyXmcK8?feature=share

एमएच 30 बीएन 8518 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने उड्डाणपुलावर प्रवेश केला. त्याच्यामागे असलेल्या एमएच 30 बीबी 0911 क्रमांकाच्या कारनेही त्याच चुकीच्या दिशेने गाडी चालवली. त्याचवेळी एमएच 26 एडी 1859 क्रमांकाचा कंटेनर येत होता. पुलावर स्थानिक नियमांच्या उल्लंघनामुळे या तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तिन्ही जखमींना तत्काळ पोलिसांनी शहरातील मेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

त्रिवेणी चौकातील उड्डाणपुलाबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. “उड्डाणपुलाची रचना अपूर्ण आणि गोंधळ निर्माण करणारी आहे. त्यामुळे वाहनचालक गोंधळून चुकीच्या दिशेने जातात. अशा घटनांमुळे वाहतुकीची कोंडी व अपघात वारंवार घडतात,” असे एका रहिवाशाने सांगितले.
अपघातानंतर ट्रॅफिक पोलीस आणि वाहतूक नियमनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “ट्रॅफिक पोलीस शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दंड वसूल करण्यासाठी उभे असतात. अचानक पोलीस दिसल्यामुळे विनापरवाना चालक गोंधळून चुकीच्या दिशेने पळ काढतात, ज्यामुळे अपघात घडतात.”
शहरातील वाहतुकीतील त्रुटी, उड्डाणपुलाची रचना, आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news