अकोलेकरानो सावधान किसान ॲप माध्यमातून लाखो रुपये भामट्यानी पळविले..!
अकोला केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कुठल्याही योजना ॲप द्वारे जाहीर केल्या जात नाही जाहीर योजना जाहीर केल्या जातात त्या योजना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्र द्वारे योजनाबाबत माहिती दिली जाते. अशा खोट्या ॲपवर बडी न पडता शहानिशा केल्याशिवाय कुठलीही ॲप उघडू नये असे आव्हान सूचना दूरध्वनी द्वारे दिले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करीत लाखो रुपये भामट्यांकडून ओढले जात आहेत अशीच घटना अकोल्या शहरात घटली असून
मोबाईल वर किसान ॲप APK येत असुन लोकांची बँक अकाउंट खाली होत आहे. काळजी घ्या आणी अशी ॲप डाउनलोड करु नका असे आव्हान सत्य लढा तर्फे करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार काल दि. ८जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या ग्रुपवर किसान ॲप टाकल्या गेले त्यावर क्लीक केले असता मनपा आरोग्य निरिकक्ष शैलेश पवार याचे ९०हजार रुपये भामट्यानी काढले त्याबाबत सायबर सेल मध्ये तक्रार केली आहे त्याबाबत पोलीस तपास करत आहे. तर आज मनपातील प्रमुख सहाय्यक सुधीर माल्टे यांच्या सुध्दा खात्यामधून ३९७००० रुपये काढल्या गेल्याने एकच खळबळ माजली आहे. असे कुठलेच ॲप डाउनलोड करु नये असे आव्हान करण्यात येत आहे.तसेच ज्या नागरिकांनी केले असेल त्यांनी लगेच बँकेत जाऊन आपले बँक खाते सुरक्षित करुन घ्यावे असे आव्हान जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनांना तर्फे करण्यात आले आहे.