कारंजा रमजानपूर शाळा खोलीचे निकृष्ट बांधकाम प्रकरण
ग्रामपंचायत अधिकारी व कनिष्ठ अभियंता निलंबीत – सीईओंनी काढले आदेश
अकोला : बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील शाळा खोलीच्या निकृष्ट बांधकामा प्रकरणात कारंजा रमजानपूरचे ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद उगले व जि.प.बांधकाम उपविभाग बाळापूरच्या कनिष्ठ अभियंता पुजा आठवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या बांधकामाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवर बांधकाम विभागाने केलेल्या तपासात या दोघांना कसूरवार ठरवित जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवार, २२ जानेवारी रोजी निलंबनाचे आदेश काढले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंर्तगत या शाळा खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, अवघ्या दहा दिवसातच या खोलीचे स्लॅबला तडे जाऊन ते कोसळले. या कामाच्या दर्जावर आक्षेत घेत ग्रामस्थांनी २७ ऑक्टोबर रोजी सीईओ यांच्याकडे कामाच्या निकृष्ठतेचे सप्रमाण तक्रार केली होती. सीईओंनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे बांधकाम विभागाला आदेशित केले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने जि.प. बांधकाम उपविभाग बाळापूरचे उप अभियंता किशोर ठेंग, कनिष्ठ अभियंता पुजा आठवले आणि ग्रामसेवक तथा सचिव प्रमोद उगले यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासे मागितले होते. विहीत मुदतीत खुलासे सादर न केल्यास अथवा खुलासा संयुक्तिक नसल्यास आपणांविरुन शिस्त व अपील नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट बजावले होते.
दरम्यान, या प्रकरणात तीघांवर कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी यातील केवळ दोघांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे जि.प.वर्तूळाच्या भूवया ताणल्या जात असून, यातील बड्या माशांना क्लीनचिट देण्यात आल्याची चर्चा रंगत आहे.
कामाबाबत सरपंच अनभिज्ञ
नियमानुसार गावांतील कोणत्याही बांधकाम किंवा अन्य कामाबाबत सरपंच यांना विश्वासात घ्यावे लागते. परंतु, या कामाबाबत कोणतीच कल्पना वा माहिती दिली नाही. कामाची निविदा, इस्टिमेट, वर्कआर्डर एवढेच नव्हे तर कामाच्या पायाभरणीचे निमंत्रणही नाही. काम सुरु झाल्यानंतर हे बांधकाम जि.प.बांधकाम विभागस्तरावरील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुणीही ग्रामस्थ या कामाच्या अधिक गोलात गेलेनाही.परंतु, अवघ्या दहा दिवसातच स्लॅब कोसल्याचे समोर आल्यानंतर सीईओंकडे तक्रार केली. तथापि, या प्रकरणातील कारवाई नि:पक्ष नसून, यात निरपराध अडकवले.
– बाळू कोगदे, सरपंच कारंजा रमजानपूरबांधकाम विभाग संशयाच्या भोवर्यात
या कामाबाबत सरपंच यांना अनभिज्ञ ठेवले गेल्याचे समोर आल्यामुळे जि.प.च्या बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. गावच्या प्रथम नागरिकास कामापासून अनभिज्ञ ठेवण्यामागे बांधकाम विभागाचा हेतू काय? परस्पर काम करण्या असे सापेक्ष सवाल आता उपस्थित होत आहेत. गावच्या प्रमुखाला अंधारात ठेवून परस्पर कामाचे नियोजन होणे, मंजूरात, निविदा आणि कंत्राटदाराला वर्कऑर्डरही देणे, याबाबी नियमाकूल आहेत का? असे प्रश्नही आता उभे होत आहेत.