मध्यप्रेदशातुन हिवरखेड मध्ये हे पिस्तूल देणार तरी होते कोणाला?

मध्यप्रेदशातुन हिवरखेड मध्ये हे पिस्तूल देणार तरी होते कोणाला?

पिस्टल, चार जिवंत काडतूससह लक्झरी बस जप्त

हिवरखेड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हिवरखेड रुपराव पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार गजानन राठोड यांचे मार्गदर्शनात झरी बाजार ते हिवरखेड रोडवर हिवरखेड पासुन ०१ की. मी. अंतरावर खाजगी ३२ सीटर लक्झरी गाडी चालक नामे शेख शरीफ शेख मजीद वय ३० वर्षे रा. मुन्द्रा ता. खकणार जि.बुऱ्हाणपूर यांचे ताब्यातुन गावठी बनावटीचे अग्णीशस्त्र (पीस्टल) व गाडी मध्ये ०४ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर पीस्टल व ०४ जिवंत काडतुस तसेच ३२ सिटर लक्झरी वाहन क्र MP 50 P 1168 असे एकुण किंमत ४ लाख ५० हजार रू. चा मुददेमाल जप्त करून नमुद आरोपीला पोस्टेला अपं.नं १४/०२५ कलम ३,२५ शस्त्र अधिनीयमाप्रमाणे गुन्हा दाखल करून नमुद आरोपी यास अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड ठाणेदार पो.स्टे. हिवरखेड यांनी व त्यांचे टीममधील पोलीस उप-निरीक्षक गोपाल पांडुरंग गिलबिले , पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, गणेश साबळे, प्रमोद चव्हाण, प्रफुल पवार, सर्वेश कांबे यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news