अकोटात भीषण अपघात; ट्रक व दुचाकीच्या अपघातात चिमुकलीचा करून अंत
अकोट शहरामध्ये अकोला नाका ब्रिजवर दर्यापूर मार्गावर ट्रक व दुचाकी मध्ये भीषण अपघातात कु. निधी दिपक जेस्वानी वय अंदाजे 7 वर्ष या चिमुकलीचा जागेवरच करून अंत झाला आहे.
ट्रक क्रमांक MH 27 X 7409 कुटाराने भरलेला अकोला नाका ब्रिजवर चढत असताना समोरून येणाऱ्या स्कुटीला जबर धडक दिल्याने चिमुरडीचा जाग्यावरच करून अंत झाला.
जोपर्यंत ट्रक चालकाला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेहाला उचलू देणार नाही, मृतदेहासमोर परिवारासहित स्थानिक नागरिकांनी ठिय्या दिला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, अकोट शहर पोलीस स व ग्रामीण पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचून, होणारा अनुचित प्रकार थांबविला.
अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.