अग्निशमन दलाच्या तत्परतेने सर्व नागरिक सुखरूप – मोठे नुकसान!
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट – अनेक दुचाकी जळून खाक!
अकोल्यातील गंगाधर प्लॉटमधील आरती अपार्टमेंटला भीषण आग – १५ नागरिक अडकले होते, सुखरूप बचाव..
आरती अपार्टमेंटला भीषण आग – १५ नागरिक अडकले होते!
अकोला शहरातील गंगाधर प्लॉट परिसरातील आरती अपार्टमेंटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत पाच ते सहा घरांचे मोठे नुकसान झाले असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
या दुर्घटनेत सुमारे १२ ते १५ नागरिक अपार्टमेंटमध्ये अडकले होते. आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन विभाग आणि पोलिसांना 108 रुग्णवाहिका ला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परतेने बचाव कार्य राबवले आणि सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. आणि रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले…
अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून पुढील तपास सुरू आहे….