सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!
मागील दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे होळी जल्लोषात साजरी झाली नाही. परंतु यंदा कोणतेही बंधन नसुन जल्लोष आणि उत्साहात सण साजरे होणार आहेत.आपल्यावर आलेले अनेक विघ्न, व्याधी, संकट आणि दु;ख होळीत जळुन जावो. अशी प्रार्थना करुन होळी पेटवली जाते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन.धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी किंवा धुळवड असे ही म्हटलं जाते. रंगीबेरंगी रंग, विविध प्रकारच्या पिचकार्या, बाजारात दाखल झालेत.होळीच्या काही दिवसांपासुनच पिचकारी आणि रंग खरेदी करण्यासाठी बाजारात लहान मुलांची रेलचेल ही सुरु होती. विविध प्रकारच्या पिचकार्या या लहान मुलांना आकर्षिक करतात. यावर्षी रंगपंचमीवर महागाईच सावट दिसुन आले. रंगासह लहान मुलांच्या आवडीच्या पिचकारी महाग झाले आहेत. यासोबतच होळी रंगपंचमीला आवश्यक असणारी साखरेची गाठी सुद्धा महागली आहे एकंदरीत होळी रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजली असली तरी महागाईमुळे खरेदी विक्री वर परिणाम झालेला दिसून आला.
सत्य लढा होळि विशेष अंक. मान्यवरांवर मारल्या सत्य लढाणे पिचकाऱ्या!