पातुर आगीखेड, पाडीऀ रस्त्याची दैनीय अवस्था
नितेश हिवराळे मा, उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते:- रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे आमचं कोणी वाली आहे का नाही हा प्रश्न पडला आहे प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन सदर रस्ता दुरुस्त करावा ही मागणी आहे या भागातील तालुकास्तरावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्तुती करिता येणाऱ्या महिलांचे बेहाल पातुर आगीखेड पाडीऀ रस्त्याची दैनीय अवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत असून एकूण सात किलोमीटरचा या रस्त्याचा प्रवास वाहनांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे एकंदरीत हा रस्ता पातुर अमरावती मुख्यमार्ग असल्याने अनेक वांहणधारक या रस्त्याचा अवलंब करतात मुख्यतः या भागातील चिमुकले विद्यार्थी सुद्धा तालुका स्तरावर उच्च शिक्षणाकरिता दैनंदिन ऐ जा करतात अशातच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे याची गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने त्वरित हा रस्त्याची पाहणी करून दखल घेण्याची मागणी विद्यार्थी पालक वर्ग करत आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा