पातुर तालुक्यातील कोठारी आस्टूल पास्टूल आगिखेड खामखेड, ग्राम शिवारात गारपीट सह वादळी पाऊस

अनेक शेतकऱ्यांचे गवासह संत्रा, कांदा जवारी उत्पादनाचे नुकसान

पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर झाल्याचे चित्र आज सायंकाळी 4 ते पाच वाजताच्या दरम्यान पहायला मिळाले आहे या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे हा प्रकार घडला आहे पातुर तालुका म्हटलं की फळबाग, फुल शेती, संत्रा आंबे, केळी, लिंबू , हरभरा गहू, व उन्हाळी जवारी अशा अनेक पिकांना ओळख देणारा तालुका म्हणून ओळख आहे परंतु आज आलेल्या चार ते सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाने झोडपले परंतू पावसासह हवा विजांनसह गारपीट झाल्यामुळे बघायती, कॅनॉल क्षेत्रातील पेरणीचा गहू, तसेच फळ शेती चे नुकसान झाले चे कळते आहे.सुनीता अर्जुन टप्पे सभापती प स पातूर:- अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,परिसरात। गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला प्रशासनाने त्वरित सर्वे करून शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

निखिल इंगळे सह किरणकुमार निमकांडे सत्य लढा न्यूज पातुर

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news