वंचित बहुजन आघाडी पातूर तर्फे अतिवृष्टी झालेल्या भागाचा तात्काळ सर्वे करून सरसकट भरपाई देण्यासाठी पातूर तहसीलदार यांना निवेदन
पातुर – तालुक्यात कोठारी खानापूर आस्टूल पास्टूल भागात काल संध्याकाळी चार ते सहा च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी मेटा कुटीस आला आहे आहे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

शेतकऱ्याचे हातचे पीक गेले आहे ,अनेक जनावरे दगावली आहेत ,अशातच वंचित बहुजन आघाडी पातुरतर्फे अतिवृष्टी झालेल्या गावाचा दौरा करण्यात आला आणि नुस्कान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांना भेटी देण्यात आल्या व वंचित बहुजन आघाडी पातुरतर्फे होईल ते मदत करण्याचे आश्वासन पातुर तालुकाध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश धर्माळ यांनी केले आहे यावेळी उपस्थित जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भाऊ फाटकर यांनी अधिकाऱ्यांना शेतकर्यांचा बांध पर्यंत नेऊन तात्काळ सर्वे करून नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करावे असे सांगितले आहे यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख पंचायत समिती सभापती सुनीता ताई अर्जुन टप्पे पंचायत समिती सदस्य पती अनिल राठोड पंचायत समिती सदस्य पती राहणार डाबेराव हरिभाऊ इंगोले जिल्हा परिषद सदस्य सावित्रीबाई राठोड अर्जुन टप्पे हिरासिंग राठोड संजू भाऊ लोखंडे स्वातीताई इंगळे संतोष तिवाले विलास घुगे जगदीश इंगळे नागेश करवते नितेश हिवराळे बाळू उगले अशोक इंगळे राजेंद्र इंगळे शैलेश देशमुख शरद सुरवाडे राजू बोरकर विजू अवचार संतोष भाऊ वनारे चंद्रकांत तायडे मंगेश गोळे मनोज गवळी दिनेश गवई राजीक भाई आदी वंचित चे कार्यकर्ते उपस्थित होते
निखिल इंगळे सह किरण निमकंडे पातूर