पातुर तालुका गारपीट ग्रस्त भागाचा दौरा
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – दिनांक १७/३/२०२३ रोजी सायंकाळी झालेल्या गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे शेतातील पिकाचे नुकसान पाहणी करीता अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर साहेब यांचा दौरा झाला खानापूर, आसटुल,पासटुल,कोठारी याभागत न्यामत खान यांच्या शेतातील संतरा मळ्याचे ,गजानन घुगे,कांदा, परशराम नारायण ढाकणे, कांदा, संतरा, गहु, कैलाश दौलत राव घुगे,शमीम खान पठाण यांच्या सह अनेक शेतकरी बांधवांनचे शेतात जाऊन पाहणी केली व आपणास नुकसान भरपाई मिळावी शासनास निदर्शनास आणून देऊ तसेच माननीय तहसीलदार यांच्या शी दौरा दरम्यान भेट झाली असता नुकसान पाहणी चे आदेश संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी दिली आहे आणी ते सर्वे करत असल्या ची माहीती दिली या वेळी अशोकराव अमानकर यांच्या सोबत पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद, कू्षी उत्पन्न बाजार समिति चे माजी सभापती दौलत राव घुगे,जिल्हा कांग्रेस चे बब्बु भाई, अतुल भाऊ अमानकर ,शमीम खान पठान,सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.