अकोला मनपावर धडकणार 20 ला महामोर्चा 

अकोला महानगर पालिकेचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी व सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व झोपेचे सोंग घेतलेल्या म.न.पा.ला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला महानगराच्या वतीने अकोला म.न.पा.वर मोर्चाचे आयोजन केले आहे.
जनतेने या महामोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आज पत्रकार परिषदेत केले आहे सोमवार दि. २०/३/२०२३ रोजी सकाळी ११ वा. वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते म.न.पा. अकोला पर्यंत महानगर पालिकेने वाढविलेला अवाजवी घरटॅक्स रद्द करावा. मनपाने अवैध व चुकीची पाणी कर वसुली थांबवावे ,पिंप्री चिंचवड महानगर पालिकाच्या धर्तीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचे सौदर्यीकरण करून त्या परिसरात घाण कचरा 
करणा-यावर दंडात्मक कारवाई करावी,अकोला शहरातील कलावंतासाठी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे,मनपा हद्दीतील जसे भरतीया दवाखाना, कस्तुरबा गांधी यांच्या सारखे 5 दवाखान्या असून यामध्ये सुविधाचा व तज्ञ डॉक्टरांचा अभाव असून यामध्ये अत्याधुनिक सेवा म.न.पा. कडून देण्यात यावे,मनपा हद्दीतील अतिक्रमित जागा नियमानुकुल करून घरकुलाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यात यावा, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याकरिता कायम स्वरूपी झोननिहाय
डंम्पींग ग्राऊंड ची व्यवस्था करण्यात यावी,खरप न्यु तापडीया नगर रेल्वे गेट उड्डाणपुल त्वरीत कामपुर्ण करून जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे, मनपामध्ये समाविष्ठ १३ ग्राम पंचायत व २४ गावातील मुलभूत सुविधा जसे पाणी,लाईट, सफाई, रस्ते, नाल्या इत्यादी सुविधा ताबडतोब पुर्ण करण्यात यावे.

त्यानंतर म.न.पा. टॅक्स लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अरुंधती सिरसाट ,डॉ संतोष हुशे, मनोहर पंजवानी, निलेश देव, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट,अकोला महानगर चे पदाधिकारी शंकरराव इंगळे, बुध्दरत्न इंगोले, वंदनाताई वासनिक, कलीम पठाण, जय तायडे, आशिष मांगूळकर,विकास सदांशीव,आदींची उपस्थिती होती.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news