भारतीय रोजगार संघटनेचा जुनी पेन्शन साठी जाहीर पाठिंबा?
काम बंद आंदोलनात चिमुकल्यांचा सहभाग?
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी १४ मार्च मंगळवार पासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज शनिवार पाचवा दिवस उजाडला तरी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी . यांच्याकडून निश्चित तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी राज्यभर पाचव्या दिवशी सुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संपामुळे सरकारी रुग्णालये, शासकीय कार्यालय. निम शासकीय कार्यालय. शाळा, कॉलेज, पालिका, महानगरपालिका बहुतांशी सरकारी विभाग गेल्या पाच दिवसापासून ठप्प आहेत. मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही आहे.
भारतीय बेरोजगार मोर्चाचे जाहीर समर्थन यावेळी देण्यात आले. कोल्हापूर मध्ये भारतीय रोजगार संघटनेने मोर्चात ही संघटना जुनी पेन्शन करिता सहभागी नसल्याची घोषित करण्यात आली होती. मात्र आज भारतीय रोजगार संघटनेने आमचा जुनी पेन्शन साठी भारतीय रोजगार संघटना ही कायमस्वरूपी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमचे संपूर्णपणे महाराष्ट्रात राज्यात सहभाग असल्याचे आज अकोल्यात संदेश कांबळे यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात चिमुकल्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. त्या चिमुकल्यांनी सुद्धा आमच्या आई-वडिलांना पेन्शन लागू करण्याची मागणी यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून केली.