आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाला गारपीटीचा तडाखा
=================
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
=================

आलेगाव दि 18 प्रतिनिधी पातूर तालुक्यातील आलेगाव, गोळेगाव, चिंचखेडा,चोंढी, गावंडगाव, नवेगाव, जाब, पिंपळडोळी, पांढुरणा,सह अनेक शेतशिवारा मध्ये दि.18रोजी दुपारी 4वा दरम्यान अवकाळी वादळ वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या विविध पिकाला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पातूर तालुक्यामध्ये दि 14 तारखे पासून अचानक वातावरणा मध्ये बदल होऊन तालुक्यामध्ये दि 17 रोज पासून अवकाळी वादळ वारा व पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा,बिजवाही कांदा,आंबा, लिंबू,व फळबाग शेत पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच दि 18 रोजी दुपारी 4 वा दरम्यान अवकाळी वादळ वारा व गारपीटीने झोडपून काढीत आलेगाव, गोळेगाव, डोलारखेड, चरणगाव, चोंढी, पिंपळडोळी, जाब, नवेगाव, गावंडगाव, ऊबरवाडी, पांढुरणा सह परिसरातील अनेक शेतशिवारा मधील शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरात पडून असलेल्या शेतमालाला बाजारपेठे मध्ये योग्य भाव मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट शेतकऱ्यांसाठी जीवघेणे बनू नये या करिता संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान पिकाचे सर्व्हेक्षन करावे व शासनाने नुकसान पिकाची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.