गुडीपाडव्याच्या राजस्थानी दिनी राष्ट्रीय हास्य कवी संमेलनाचे आयोजन राजस्थानी सेवा संघाचा बहारदार कार्यक्रम

अकोला- सामाजिक, सांस्कृतिक व राजस्थानी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबविण्याच्या राजस्थानी सेवा संघाच्या वतीने गुढीपाडवा दि. 22 मार्च या राजस्थानी दिनावर महानगरात अनेक वर्षांनंतर विराट राष्ट्रीय हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी स्थानीय अग्रसेन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी दिली.यावेळी सेवा संघाचे महामंत्री शैलेंद्र कागलीवाल सुधीर रॉदड उपस्थित होते. राजस्थानी सेवा संघाच्या परंपरे प्रमाणे राजस्थानी संस्कृतीचे जतन, संवर्धन व सुसंघटन करण्यासाठी राजस्थानी दिन दरवर्षी विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असतो.

यावर्षी अनेक वर्षानंतर राष्ट्रीय हास्य कवी संमेलन घेण्यात येत आहे. बुधवार दि 22 मार्च रोजी साथ 6-30 वाजता स्थानीय डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित या कवी संमेलनात देशविदेशात गाजलेले प्रख्यात हास्य व्यंग व मंच संचालक कवी दिनेश बावरा मुंबई, भीलवाडा येथील राजस्थानी गीतकार, वीररसचे कवी कैलास मंडेला, जोनपुर उत्तरप्रदेशचे गीतकार चंदन रॉय, वर्धा येथील युवा गझलकार दीपक मोहळे, अकोला येथील हास्य व्यंग रचनाकार प्रा घनश्याम अग्रवाल व हास्य व्यंग कवी कृष्णकुमार शर्मा आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राजस्थानी समाज बांधवांसाठी आयोजित या कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी राजस्थानी समाजातील सर्व सतरा घटकांच्या शाती प्रमुखाकडे प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून समाज बांधवांनी या प्रवेशिका आपापल्या ज्ञाती प्रमुखांकडून प्राप्त करून घ्याव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा सोहळा सुचारूपणे पार पाटण्यासाठी विविध उपसमित्या गठीत करण्यात आल्या असून समाजातील महिला पुरुषांना बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विशेष पाहुणे म्हणून खा. संजयभाऊ धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ रणधीरभाऊ सावरकर, आ वसंत खंडेलवाल, आ विप्लव बाजोरिया, माजी आ बबनराव चौधरी, माजी आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेत यावेळी सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ जुगल चिराणीया, विजय पनपालिया, डॉ आर बी हेडा, राजू अग्रवाल आशीर्वाद, मधुर खंडेलवाल विजय तिवारी, शैलेंद्र पारख, मंत्री सीए मनोज चांडक, सहमंत्री दीपक शर्मा, एड दुष्यंतसिंह ठाकूर, महेश अरोरा खत्री, कोषाध्यक्ष कमलकिशोर वर्मा, अंकेक्षक राजीव बजाज आदी उपस्थित होते. या एक दिवशीय राजस्थानी दिवस समारोहात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विनोद गोले मनोजकुमार बंग, दिलीप खत्री, रमेश राजोरिया, धनराज आजादीवाल, मदन भरगड, दीपक साकला, जगदीश प्रजापत, एड सुभाषसिंह ठाकुर, दयाराम शर्मा जांगिड, अजय सेंगर, एड पप्पू मोरवाल समवेत अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी ब्राह्मण समाज, ओसवाल समाज, खंडेलवाल समाज, खत्री समाज, सोनार समाज, जाट समाज, सेन समाज, गुर्जर समाज, जिनगर समाज.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news