अर्धवट उड्डाणपुलाला गळती संबंधित कंपनीने काम सोडले अर्धवट!
अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानेच उभारण्यात आलेला अर्धवट उड्डाणपुलाला गळती लागली असून अर्धवट उड्डाण पुलाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून. सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून अकोल्या शहरात पाऊस पडत असून या पावसाचे पाणी अर्धवट उड्डाण पुलावरून वाहनधारकांच्या अंगावर पडत आहे. अर्धवट उड्डाण पुलावर पाईपलाईन द्वारे खालती पाणी सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली तर काही ठिकाणी पाईपलाईनचे जॉईंट लावण्यात न आल्याने सदर अर्धवट उड्डाण पुलावरील पाणी वाहनधारकांच्या अंगावरती पडताना दिसत आहे. पुलावरील पाईपलाईन च्याद्वारे हे पाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे येथे वाहने स्लिप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संबंधित कंपनीने अर्धवट काम केल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास याचा सहन करावा लागत आहे.